Er Rational musings #1159

Er Rational musings #1159

कामे ठप्प आहेत. जॉब मार्केट डाऊन आहे. सगळं वातावरण गढूळ झालय. नोटाबंदी, जीएसटी व रेरा यांनी कॅश फ्लो (व्हाईट च म्हणतोय) मंदावलाय, थंडावलाय. अपुरे प्रकल्प एकतर पूर्णपणे बंद आहेत वा दोनतर टूकूटूकू चालू आहेत. जान नाहीये. मरगळ आलीये सगळीकडे.

सुस्ती व भिती, आणि नवनवीन नीती, आर गोईंग हॅन्ड इन ग्लोव्हज् टूगेदर. अॅन्ड धीस फेज इज लाईकली टू कंटीन्यू. अॅटलीस्ट फॉर अ ईयर अॉर टू.

~ जो हो रहा हैं, सहीं हो रहा हैं| पर ss
~ आपल्याकडे जबरदस्तीनेच लोक्स हलतात.
~ हेडमास्तरच हवा होता.

ह्या झाल्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

कॅश निर्बंध. काळ्या पैशावर नजरनियंत्रण. अॉनलाईनीकरण(!), सुलभसोप्पकरण(!), स्ट्रीमलाईनीकरण(!) बऱ्याच महत्वाच्या गोष्टींचं. हे झालय आता करून. एक fear psychosis आप्पोप निर्माण झालाय. हे सर्व बदल नेकनितीनियतीला धरूनच झालेत व होताहेत, ह्याबद्दल बहुतांश नागरिकांत दुमत नाहीच आहे.

माझं म्हणणं असं आहे, की झालं आता करून सगळं. आता खूप पळवलं सगळ्या घटकांना. आता तुमच्यावर राज्य. आता तुम्ही पळायचं. म्हणजे नक्की काय करायचे? तर बास आता onslaught. थोडं time please. किंवा, आम्हाला statue!!

Now is the time to flood the market with white money. Banks have enough of it. Give cheaper loans. Promote now, not with policies – those are conveniently in place now – but with promissory notes! Attack price rise in all commodities with all your might, all resources at your disposal, all means possible.

Make livelihood cheaper for a stupid common man!

बस्स, इतनीसी ख्वाईश…

मिलिंद काळे, ठाणे
९ अॉगस्ट २०१७

(पोस्ट शेअर करू शकता पण लेखकाचे नाव व मजकूर, यात बदल न करता)

An ode of humanity

France terrorist attack…

An ode of humanity

The Sun, Stars, Comets, n Moons
Celestial galaxy encompasses @ll
Amphibian life is offered on a platter
Then why should some fanatics slaughter

Baseless, shameless and ruthless
They strike with whims and fancy
Pune, Peshawar to Paris
The anarchists know no boundary

Acts of brutality and cowardice
The barbarians fit into a stone age
All religions, casts, creeds n prides
To Unite and retaliate with courage

The Amoeba, so vicious n venomous
Akin to a vampire strangulating a pure soul
Is amongst us in camouflage
To ensure bloodbath, chaos and inter-religious rage

A fervent appeal to the sane brethren
Decipher and interpret the HOLY book
Denounce in unison, weed out the extremists
Who are hiding in every corner n nook

Help salvage the world
From these sadists n rascals
This era of equality
Offers @ll an ample opportunity

From Pakistan to France to Yemen to Afghanistan
To Nigeria to Iraq to USA to India
A serious threat to our Global community
Must be crushed with a clenched fist and knock-out finality!!

Milind Kale, 15th November 2015

Time n again, it’s getting proved. Please understand who is the enemy number 1.
Prioritise your social media attacks

Milind Kale, 19th March 2016

Whatsapp addiction

भाऊगर्दीत, व्हॉट्सऍपच्या ग्रूप्स मधला मधाळपणा हरवलाय का हो
दृष्टी आड सृष्टीच्या पडद्या मधला
तोंडदेखला मोकळेपणा बळावलाय का हो

जबरदस्तीच्या आपलेपणा मधला
वरवरचा खुलेपणा थिरकलाय का हो
तू छान मी छान आपण छान मधला
प्रत्यक्ष खरा काही विषय उरलाय का हो

रित्या कोरड्या दुभंगलेल्या व्यक्तिं मधला
हुकलेल्या क्षणांचा साक्षीदार उरलाय का हो
वांझोट्या वेळकाढू चर्चे मधला
धीर गंभीर आशयघन गळालाय का हो

कायमच्या वन अपमँन शिप मधला
जीवघेणा खेळ ठरलाय का हो
एकही शब्द खाली न पडू देण्या मधला
बालिश काळ सोकावलाय का हो!?

by Milind Kale

Ganapati bappa

मोरया रे बाप्पा मोरया रे…

श्री तुझे रूप, श्री तुझे मुख, श्री तुझे ध्यान
आगमन वंदनीय पूजनीय, देई समाधान

श्री तुझी किर्ती, श्री तुझी भक्ती, श्री तुझी मूर्ती
करो पाप क्षालन दुष्ट संहार, कामना पूर्ती

श्री तुझे नाम, श्री तुझा ठाव, श्री तुझी आरती
देवो सद्बुद्धि दूरद्रृष्टी, मंगलमय यशोज्योती

श्री चरणी नतमस्तक, संपूर्ण लोटांगण शरण
क्रृपासिंधू क्रृपाद्रृष्टी मस्तकी आशिर्वाद प्राण!

by Milind Kale

Nutrition tip #1

अन्न हे पूर्णब्रह्म!

 

पोळी, भाजी, भात, आमटी किंवा वरण, तूप, मेतकूट, मीठ, लिंबू, कोशींबीर, चटणी किंवा लोणचं, एखादा गोड पदार्थपाक / केळं (शिकरण) / पीठी साखर / गुळ ते खीर / गाजर किंवा दूधी हलवा / गुलाबजाम / श्रीखंड किंवा आम्रखंड / बासूंदी / जिलबी / रवा किंवा बेसन किंवा डिंक किंवा दाण्याचा किंवा बुंदीचा किंवा मोतीचूर लाडू, मसाले भात, दही भात, भाकरीपिठलं, पूरी, आंबरस, तिखटामिठाची पूरी, ताक किंवा दही.

(अंडी, मटण, मासे, कोंबडी, पोर्क) यांचा कुठलाही पदार्थ, पाव, लिंबू, कांदा, चपाती, भाकरी, बिर्याणी, बिर्याणी राईस, मस्त तेलाचा तवंग आलेला तिखटजाळ रस्सा, सोलकढी.

कसलं न्यूट्रिशन अन् कसलं डाएट!

आवडेल, पटेल, भावेल, परवडेल, पचेल, रुचेल आणि पोट भरेल (!) ते ते सर्व खा. हे विश्वची माझे घर म्हणत, कुठेही खा. द्रूष्टीआड स्रूष्टी लक्षात ठेवा. प्रेमाने खा. आनंदाने खा. कौतुक करत खा. बोलता खा. (आणि माझ्या सारखं खामोबाइल बंद ठेवा, फूल शर्ट असेल तर बाह्या फोल्ड करा, रूमाल मांडीवर पसरा, आणि गोविंदमम म्हणा!) खाताना कसलीही लाज / भीड बाळगू नका. भरपूर पाणी प्या. चित्र विचित्र आवाज आले तर संकोच करू नका. पूर्ण समरस, तल्लीन व्हा, पूर्ण न्याय द्या. काहीही टाकू नका. (माझी आज्जी सांगायचीपानताट एवढं स्वच्छ झालं पाहीजे की दूसरा कोणी त्यातच जेवायला बसला पाहीजे!!)

चला

वदनी कवळ घेता….

by Milind Kale

Thinking

स्व आयुष्य म्हणजे नेमके काय की
कोणाशी बेरीज, काही वजाबाकी
कधी गुणाकार, केव्हा भागाकार
सगळाच बेभरवशाचा कारभार

 

कधी आतबट्याचा व्यवहार
कुठेतरी काहीतरी स्वैराचार
भावनीक मानसिक व्यभिचार
नकळत मात्रे द्रूष्टांत साक्षात्कार

 

म्रत्युंजय म्हणे नको अविचार
एकांतमने कर सारासार विचार
मी, माझे, मला, मी पणाचा फुत्कार
प्रभाते मनी नव साष्टांग नमस्कार

 

बघता चढता आलेख चमत्कार
इंद्रधनुष्य मोरपिशी उत्स्फूर्त आविष्कार 
दैदिप्यमान यश आपोआप अंगीकार 
सर्वार्थे निस्वार्थे डोळस विश्वास
शून्य अहंकार!!

by Milind Kale

Pause, look and go

थोडे थांबूया, pause घेऊया
Introspection करूया
पुंजावळी, साठवण बघूया
पुढील तरतूद ठरवूया

 

आई वडील, बायको मुले
ह्यांची तजवीज करूया
काय हवं काय नको, हे नीट समजूया
आणि थोडे स्वत:कडेही लक्ष देऊया

 

BP, Diabetes चेक करूया
स्ट्रेस टेस्ट ला ही सामोरे जाऊया
ब्लड sample test करूया, नव्हे,
Full body चेकअपच करूया

 

सल्ला doctor चा घेऊया
खाणे पिणे जरा control करूया
नियमित व्यायाम, exercise, yoga करूया
वेळा पाळूया, discipline अंगी बाणवूया

 

काळजी घेऊया, शारिरिक सांभाळून रहाऊया,
ह्याउप्पर काही विपरीत घडले तर accept करूया!!

पन्नाशी उलटली, राजे, आता तरी जागे व्हा
तब्येत ठाकठीक ठेवूया, priority बदलूया
Health is true wealth हेच ब्रीदवाक्य
पुढची वाटचाल सुख पादाक्रांत (!) करूया!

by Milind Kale

Minuscule mind

मन वाभर सैर भैरं, क्षणात रुसणारं
मन बेधुंद उडणारं, क्षणात हसणारं

 

मन वाहे गगनात, मन मस्त आनंदीत
मन भावना रुजवीत, मन मोठ्ठ समजूत

 

मन काबूत शिंपीत, मन दावणीला जोडत
मन पंख पसरत, मन उंच उंच झोकत

 

मन मोहोर फुलत, मन बहर सजत
मन स्वप्नं गुंफत, मन जग जिंकत

 

मन सुंदर सुरेख काव्य कवी कल्पत
मन हे मीने परी स्वच्छंद अलगद तरंगत

by Milind Kale

मुक्तचिंतन A to Z

अंतरंग आकलन आणि अनंत अनुभव
बरीच बजबजपूरी, बहिश्रूत बाजारीकरण
कस्पटासमान क्र किटक किंवा क्रयशक्तिची कमतरता
दावणीला दभंग, दूही द्रोह
एकांगी एकांक, एकत्र एकापेक्षा एक
फरफट फार्सीकल फायदे फार
गर्व गोंजारणारी गोची
हार हव्यास हाव हवीहवीशी
इतकेकी इतकेच इतरत्र इतिशी इतिश्री
जयजयकार जास्त जीत जाणीव
काकस्पर्ष कठीण काळ कुर्निसात 
लवून लयबद्ध लाख लक्ष लक्ष्य
मानवंदना मुबलक मस्त मोकळीक
ना नतद्रष्ट, नव्हे, नवरूप नेक निवेश
ओलांडत ओंजळीत ओम ओमकार
पसायदान प्रतिशत प्रचंड प्रखंड
क्यूबिक क्यू क्यूक्लुप्ती!
रसरशीत रक्ताभिरण रक्तचंदन
टवटवीत टिवटीव टिकाऊ
उंबरा उभा उताणा
विजयी विश्व विश्वजीत विकास विशेष
वेगळी वाट वहिवाट
एक्सप्रेस एक्सचेंजर एक्स
ययाति यदू युधिष्ठिर यात्रा यासम्य
झंझावात झुळूक झुंजार!

by Milind Kale