Monthly Archives: August 2017

Er Rational musings #1159

Er Rational musings #1159

कामे ठप्प आहेत. जॉब मार्केट डाऊन आहे. सगळं वातावरण गढूळ झालय. नोटाबंदी, जीएसटी व रेरा यांनी कॅश फ्लो (व्हाईट च म्हणतोय) मंदावलाय, थंडावलाय. अपुरे प्रकल्प एकतर पूर्णपणे बंद आहेत वा दोनतर टूकूटूकू चालू आहेत. जान नाहीये. मरगळ आलीये सगळीकडे.

सुस्ती व भिती, आणि नवनवीन नीती, आर गोईंग हॅन्ड इन ग्लोव्हज् टूगेदर. अॅन्ड धीस फेज इज लाईकली टू कंटीन्यू. अॅटलीस्ट फॉर अ ईयर अॉर टू.

~ जो हो रहा हैं, सहीं हो रहा हैं| पर ss
~ आपल्याकडे जबरदस्तीनेच लोक्स हलतात.
~ हेडमास्तरच हवा होता.

ह्या झाल्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

कॅश निर्बंध. काळ्या पैशावर नजरनियंत्रण. अॉनलाईनीकरण(!), सुलभसोप्पकरण(!), स्ट्रीमलाईनीकरण(!) बऱ्याच महत्वाच्या गोष्टींचं. हे झालय आता करून. एक fear psychosis आप्पोप निर्माण झालाय. हे सर्व बदल नेकनितीनियतीला धरूनच झालेत व होताहेत, ह्याबद्दल बहुतांश नागरिकांत दुमत नाहीच आहे.

माझं म्हणणं असं आहे, की झालं आता करून सगळं. आता खूप पळवलं सगळ्या घटकांना. आता तुमच्यावर राज्य. आता तुम्ही पळायचं. म्हणजे नक्की काय करायचे? तर बास आता onslaught. थोडं time please. किंवा, आम्हाला statue!!

Now is the time to flood the market with white money. Banks have enough of it. Give cheaper loans. Promote now, not with policies – those are conveniently in place now – but with promissory notes! Attack price rise in all commodities with all your might, all resources at your disposal, all means possible.

Make livelihood cheaper for a stupid common man!

बस्स, इतनीसी ख्वाईश…

मिलिंद काळे, ठाणे
९ अॉगस्ट २०१७

(पोस्ट शेअर करू शकता पण लेखकाचे नाव व मजकूर, यात बदल न करता)