Category Archives: Uncategorized

Mumbai bleeding

ओरडून सांगतीय जगाला
आमच्या देशाची
आर्थिक राजधानी
पूरे झाली आता ही मुक्त मनमानी

 

बस झाले आता
थांबवा हे लोंढे
परप्रांतियांचे थवेच थवे
लचके तोडी माझे, करूनी नागवे

 

पावसाचं काय हो
धो धो हवाच, चिंब शिंब भिजायला
संतत मुसळधार
धरणं भरून ओसंडायला

 

नव विकासाचे पर्व
खुणावतयं, जागवतय कुंभकर्णाला
महापालिका असो वा मंत्रालय
सुस्त निपचित अजगराला

 

शिस्त, शिरस्ते नियम मीच का पाळायचे
काहीही फेका, कुठेही फेका
कसेही फेका, कितीही फेका
तोफेच्या तोंडी मीच का जायचे

 

बेसूमार झाल्या झोपड्या, अनधिकृत वस्त्या
दिवसाउजेडी लूट होई तुम्हा डोळ्यादेखत
रस्ते पडणारच अपूरे, फेरीवाल्यांच्या गिळक्यात
म्हणू नका आम्ही सुपात, व्यवस्था यंत्रणा जात्यात

 

 

हाताबाहेर गेलीये परिस्थिति
हवे कठोर कडक अत्रंगी उपचार 
भस्म्या रोग असे हा, उपटसुंभी अवतार
साथ हवी तुम्हा सर्वांची साो करू चमत्कार

 

ओरडून सांगतीय जगाला
आमच्या देशाची
आर्थिक राजधानी
पूरे झाली आता ही मुक्त मनमानी

by Milind Kale

Pastreality

स्वप्नाळी युगुल परिपक्व,
सम्रूध्द समाधानी
आठवी आणाभाका
घेतील्या नसता ध्यानीमनी

 

वेडच ते यौवन तारूण्य
ती ओढ, मनीशी हवीहवीशी भुरभूर
झालीच वजाबाकी अन् भागाकार
राहीला अपूर्णांक, दोषी नियतीच कठोर

 

तो त्याचा, न् त्याचाच तो, तसाच
अनभिज्ञ, अलिप्त, :शब्द असाच
तो अध्यारूतच; तीही तशीच
स्मित खळाळेच, संभार मोरपिसेच
टवटवीत दिलखुलासच उवाच;

 

आठवणींची उजळणी, मनसोक्त स्वापलेपण
नव्हे, निर्मळ निरपेक्ष निर्भेळ मैत्रीची साठवण!

by Milind Kale

Odd man out

कर ना मन मोकळे, बोल ना घडाघडा
आतल्या आत कुथू नकोस, इच्छा मारू नकोस
झालाय जरी भावनांचा विस्फोट 
साद प्रतिसादांच्या चढउतारांना विसरू नकोस

 

चल, एक खेळ खेळूया, 
डोळे बंद करून स्तब्ध बसूया
ऊन पावसाचा लपंडाव ऐकूया!
चढ उतार, भरती ओहोटी आठवूया

 

मातीचा म्रूद्गंंध श्वास भरून घेऊया
पेरावे तसं उगवतं हे जाणूया
आक्सीजन समसमान वाटून साठवूया
ऊंची विनम्रता, ताठ बाण्याने जगूया!

 

पौर्णिमा अमावस्या, हिवाळा ऊन्हाळा
अखंड हे अविरत अव्याहत रूतू चक्र
दिवसांमागे रात्र, उजाडणारा काळोख,
नव उष:काल पचवूया
कारण नंतर ढगांआड वीजांचा
आहेच ना धो धो पावसाळा!

by Milind Kale

Lucky

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात
मुळातच शून्य, तरी शहाणपणा अंगात

 

नशीब बलवत्तर आणि कुलदैवत पाठी
तरीच मिरवतो शेखी, धरी सर्वां वेठी

 

पूर्वजांची पूण्यायी वेळ मारून नेई
जरी खाऊन पिऊन सूखी, असमाधानच होई

 

लोका सांगे ब्रह्मदन्यान, स्वत: काळा पाषाण
माजोर्डी व्रूत्ती मिरवे प्रौढी, नाही हो सूजाण

 

कितीही आव आणो, भरूनी हवा शीडात
आगाऊपणा भारी, यांचे पाय पाळण्यातच दिसतात

 

जाऊ द्या, झाले गेले गंगेला मिळाले म्हणूयात
सोडून द्या, कारण यांची अक्कलच आहे गुडघ्यात!

by Milind Kale

Present tense

देणार्याने देत जावे, घेणारयाने घेत जावे
घेता घेता एक दिवस, देणार्याचे हातच घ्यावे
असंच काहीसं बघायला मिळतं.
आणि naturally, आपण आपल्या करण्याचा मोबदला मागतो. Results, आज, आत्ता, ताबडतोब! गैर आहे का?
का आपलं
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।।
Debatable point!
कारण

 

कळतय पण वळत नाहीये,
सांगणं सोप्प आहे आचरणात कठीण
परिस्थितीशी दोन हात करता करता
हताश हतबलता पीछा सोडतच नाहीये!?

 

Reality is stark, can give cold shoulder
Very difficult proposition altogether
Do right, think right, expect right
On d contrary, nothing goes right, brother!

 

कहते हैं जो भी होगा, तब होगा, अच्छा होगा।
पर अच्छाई खुदाई किस काम की,
जब हम कहते हैं मेहनत का फल मीठा होता हैं।
और पता नहीे, सही गलत का फैसला कब कहा कैसे होगा।

by Milind Kale

God bless @ll

भक्ती सोहळा, भक्त मेळा
नेत्र भरूनी याची देही याची डोळा
भक्ती रसात न्हालो या
भक्ती भावूक झालो म्या

 

ओ्म श्री स्वामी समर्थ
नतमस्तक अक्कलकोटी स्वामी महाराज
जपा भीमरूपी महारुद्रा, म्हणा ताटी उघडा ग्यानेश्वरा
श्री सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ

 

तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार
थोर सद्गुरु शिकवण
गण गण गणात बोते
जय गजानन श्री गजानना पाचारण

 

टाळ म्रुदुंग झांजा वाजती
गजर मोरया मोरया, हरी नाम मुखी
ग्यानबा तुकारामाची महती
जगी तोची सर्वसुखी

 

श्री साईनाथ महाराज की जय
उचलली बाबांची पालखी
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे
इति श्री आशिर्वाद दिधती

 

पायी हळू हळू चाला मुखाने मोरया बोला
करा हरी नामाचा गजर
वंदन शरण तूज मी भगवंता
अपार श्रद्धा सबूरी ठेवा!

by Milind Kale

As is where is

कितीही आपटा, करा आटापिटा, 
होणारं तेव्हाच होणार

कितीही मारा उड्या, मोठ्या गमजा
घडणारं तेव्हाच तेच घडणार

 

कर्म करत रहा, भोग कोणाला चुकलेत
उपास तापास उपासना पोथी पारायणात फसलेत

 

देव देव करत जसे महाराज गुरुवारी
मंगळवारी गणपती शनी मारूती शनिवारी

 

सोमवार मंगळवार गुरूवार नोनव्हेज नकोच आहारी
सोयीस्कर बुधवार रविवार अंड्याची न्याहारी

 

अरेरे बघा कित्ती किती दांभिकपणा
चाले विठ्ठल बुधवार सूर्य रविवार 
पहा, मासे मटण चिकन आणा
आणी बुधवारी रविवारी भरपेट हाणा

 

कशाला तो गुरूराज पुष्कराज, मोती माणिक
हाताची बोटेही पडतील कमी
मन, मनगट मेंदू असे सर्वां भारी
कर्ती करविती अद्न्यात शक्ती असे ना सारी

 

प्रयत्न, विश्वास, काबाडकष्ट, सचोटी निर्धार
आज ना उद्या तुम्हीच आपले ध्येय उद्दीष्ट गाठणार

by Milind Kale

Fantasy

विरहांकित न्याहाळे चातक लाऊन आस
क्षणोंक्षणी आठवें ते स्वप्न प्रियकर खास

 

उर्मी उरी घेऊन अर्थ पूरक कटाक्ष
धडधडे ह्रदय ठेवित व्याकुळ लक्ष

 

तारूण्य सुलभ ओढ ही प्रणयक्रिडा साज
मनी वसे तो स्वप्नी दिसे राजबिंडा युवराज

 

मनोमिलन उत्तररात्रि बहरत साजश्रूंगार
साथसंगत सहजीवन सुखनैव करी संसार

by Milind Kale

Whatsapp mania

अती झाल जोकींग, च्याटिंग, अन् बॉन्डिंग
फुल्ल टू इमोशनल पोस्टिंग अन् सेंन्डिंग

 

कधी शाळा, बाक, चिंचा, गाव अन् बोरं
सूर पारंब्या, खडू, चेंडू फळी अन् ढोरं

 

काय राव, हे असच नाही का चालणार
का एक रूपयाच्या मणभर शेंगा आठवणार

 

जगरहाटी उन्नति प्रगति समजून घ्या थोडी
नेटसेट, एफ बी, व्हा्ट्सअप करणारच कुरघोडी

 

जूनं ते सोनं पण नवं ते हवं ह्योच लय भारी
व्हा आश्वस्त! म्हणा देव तारी त्याला कोण मारी!

by Milind Kale

Wake up call

उद्विग्न, विषणण करणारे हे समाजमन
ढोंगी बुरखटलेली संघटीत मानसिकता

दिगमूढ, प्रसंगी आचंबीत करणारी समाज अवस्था
आणि तरीही नामानिराळी असवस्थ व्यवस्था

 

किती काळ चालणार ही तटस्थता
मला काय त्याचे, ही तरासिक तरयसथता

चला निर्माण करू संपन्न समरुदध मेखला
निर्धारित कणखर, मजबूत सशक्त श्रृंखला!

by Milind Kale