Mumbai bleeding

ओरडून सांगतीय जगाला
आमच्या देशाची
आर्थिक राजधानी
पूरे झाली आता ही मुक्त मनमानी

 

बस झाले आता
थांबवा हे लोंढे
परप्रांतियांचे थवेच थवे
लचके तोडी माझे, करूनी नागवे

 

पावसाचं काय हो
धो धो हवाच, चिंब शिंब भिजायला
संतत मुसळधार
धरणं भरून ओसंडायला

 

नव विकासाचे पर्व
खुणावतयं, जागवतय कुंभकर्णाला
महापालिका असो वा मंत्रालय
सुस्त निपचित अजगराला

 

शिस्त, शिरस्ते नियम मीच का पाळायचे
काहीही फेका, कुठेही फेका
कसेही फेका, कितीही फेका
तोफेच्या तोंडी मीच का जायचे

 

बेसूमार झाल्या झोपड्या, अनधिकृत वस्त्या
दिवसाउजेडी लूट होई तुम्हा डोळ्यादेखत
रस्ते पडणारच अपूरे, फेरीवाल्यांच्या गिळक्यात
म्हणू नका आम्ही सुपात, व्यवस्था यंत्रणा जात्यात

 

 

हाताबाहेर गेलीये परिस्थिति
हवे कठोर कडक अत्रंगी उपचार 
भस्म्या रोग असे हा, उपटसुंभी अवतार
साथ हवी तुम्हा सर्वांची साो करू चमत्कार

 

ओरडून सांगतीय जगाला
आमच्या देशाची
आर्थिक राजधानी
पूरे झाली आता ही मुक्त मनमानी

by Milind Kale

Leave a Reply

Your email address will not be published.