Nutrition tip #1

अन्न हे पूर्णब्रह्म!

 

पोळी, भाजी, भात, आमटी किंवा वरण, तूप, मेतकूट, मीठ, लिंबू, कोशींबीर, चटणी किंवा लोणचं, एखादा गोड पदार्थपाक / केळं (शिकरण) / पीठी साखर / गुळ ते खीर / गाजर किंवा दूधी हलवा / गुलाबजाम / श्रीखंड किंवा आम्रखंड / बासूंदी / जिलबी / रवा किंवा बेसन किंवा डिंक किंवा दाण्याचा किंवा बुंदीचा किंवा मोतीचूर लाडू, मसाले भात, दही भात, भाकरीपिठलं, पूरी, आंबरस, तिखटामिठाची पूरी, ताक किंवा दही.

(अंडी, मटण, मासे, कोंबडी, पोर्क) यांचा कुठलाही पदार्थ, पाव, लिंबू, कांदा, चपाती, भाकरी, बिर्याणी, बिर्याणी राईस, मस्त तेलाचा तवंग आलेला तिखटजाळ रस्सा, सोलकढी.

कसलं न्यूट्रिशन अन् कसलं डाएट!

आवडेल, पटेल, भावेल, परवडेल, पचेल, रुचेल आणि पोट भरेल (!) ते ते सर्व खा. हे विश्वची माझे घर म्हणत, कुठेही खा. द्रूष्टीआड स्रूष्टी लक्षात ठेवा. प्रेमाने खा. आनंदाने खा. कौतुक करत खा. बोलता खा. (आणि माझ्या सारखं खामोबाइल बंद ठेवा, फूल शर्ट असेल तर बाह्या फोल्ड करा, रूमाल मांडीवर पसरा, आणि गोविंदमम म्हणा!) खाताना कसलीही लाज / भीड बाळगू नका. भरपूर पाणी प्या. चित्र विचित्र आवाज आले तर संकोच करू नका. पूर्ण समरस, तल्लीन व्हा, पूर्ण न्याय द्या. काहीही टाकू नका. (माझी आज्जी सांगायचीपानताट एवढं स्वच्छ झालं पाहीजे की दूसरा कोणी त्यातच जेवायला बसला पाहीजे!!)

चला

वदनी कवळ घेता….

by Milind Kale

Leave a Reply

Your email address will not be published.