Pause, look and go

थोडे थांबूया, pause घेऊया
Introspection करूया
पुंजावळी, साठवण बघूया
पुढील तरतूद ठरवूया

 

आई वडील, बायको मुले
ह्यांची तजवीज करूया
काय हवं काय नको, हे नीट समजूया
आणि थोडे स्वत:कडेही लक्ष देऊया

 

BP, Diabetes चेक करूया
स्ट्रेस टेस्ट ला ही सामोरे जाऊया
ब्लड sample test करूया, नव्हे,
Full body चेकअपच करूया

 

सल्ला doctor चा घेऊया
खाणे पिणे जरा control करूया
नियमित व्यायाम, exercise, yoga करूया
वेळा पाळूया, discipline अंगी बाणवूया

 

काळजी घेऊया, शारिरिक सांभाळून रहाऊया,
ह्याउप्पर काही विपरीत घडले तर accept करूया!!

पन्नाशी उलटली, राजे, आता तरी जागे व्हा
तब्येत ठाकठीक ठेवूया, priority बदलूया
Health is true wealth हेच ब्रीदवाक्य
पुढची वाटचाल सुख पादाक्रांत (!) करूया!

by Milind Kale

Leave a Reply

Your email address will not be published.