Thinking

स्व आयुष्य म्हणजे नेमके काय की
कोणाशी बेरीज, काही वजाबाकी
कधी गुणाकार, केव्हा भागाकार
सगळाच बेभरवशाचा कारभार

 

कधी आतबट्याचा व्यवहार
कुठेतरी काहीतरी स्वैराचार
भावनीक मानसिक व्यभिचार
नकळत मात्रे द्रूष्टांत साक्षात्कार

 

म्रत्युंजय म्हणे नको अविचार
एकांतमने कर सारासार विचार
मी, माझे, मला, मी पणाचा फुत्कार
प्रभाते मनी नव साष्टांग नमस्कार

 

बघता चढता आलेख चमत्कार
इंद्रधनुष्य मोरपिशी उत्स्फूर्त आविष्कार 
दैदिप्यमान यश आपोआप अंगीकार 
सर्वार्थे निस्वार्थे डोळस विश्वास
शून्य अहंकार!!

by Milind Kale

Leave a Reply

Your email address will not be published.