Whatsapp addiction

भाऊगर्दीत, व्हॉट्सऍपच्या ग्रूप्स मधला मधाळपणा हरवलाय का हो
दृष्टी आड सृष्टीच्या पडद्या मधला
तोंडदेखला मोकळेपणा बळावलाय का हो

जबरदस्तीच्या आपलेपणा मधला
वरवरचा खुलेपणा थिरकलाय का हो
तू छान मी छान आपण छान मधला
प्रत्यक्ष खरा काही विषय उरलाय का हो

रित्या कोरड्या दुभंगलेल्या व्यक्तिं मधला
हुकलेल्या क्षणांचा साक्षीदार उरलाय का हो
वांझोट्या वेळकाढू चर्चे मधला
धीर गंभीर आशयघन गळालाय का हो

कायमच्या वन अपमँन शिप मधला
जीवघेणा खेळ ठरलाय का हो
एकही शब्द खाली न पडू देण्या मधला
बालिश काळ सोकावलाय का हो!?

by Milind Kale

Leave a Reply

Your email address will not be published.